मुंबई- बिग बॉसच्या घरात गेली १६ आठवडे सुरू असलेला ड्रामा आणि त्याचे सस्पेन्स संपले असून १५ व्या सिझनची विजेती घोषित करण्यात आले आहे. रिअॅलिटी शोचा होस्ट सलमान खान याने रविवारी मध्यरात्री तेजस्वी प्रकाशला 'बिग बॉस 15' ची विजेती म्हणून घोषित केले. शो बंद करीत असताना पुढच्या सिझनमध्ये आपण असू किंवा नसू मात्र शो सुरू राहिल असे सलमानने सांगितले. त्यामुळे मनोरंजन जगतात सलमानच्या या वाक्याची चर्चा सुरू झाली आहे.
कलर्सवर प्रसारित होणार्या 'नागिन 6' या काल्पनिक मालिकेतील अभिनेत्री आणि अभियांत्रिकी पदवीधर-टीलीव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश बिग बॉस ट्रॉफी आणि 40 लाख रुपयांचा धनादेश घेऊन घरी जाणार आहे.