मुंबई- टीव्ही कलाकार करण ओबेरॉय यास मुंबई ओशिवरा पोलिसांनी एका महिला ज्योतिषावर बलात्कार केल्या प्रकरणी अटक केली आहे. करण ओबेरॉयने आपल्याशी २०१६ मध्ये डेटिंग वेबसाईटच्या माध्यमातून संपर्क साधून मैत्री केली होती. यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर करणने त्याच्या मुंबई स्थित घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर त्याने सतत या महिलेशी शरीरसंबंध ठेवून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
महिला ज्योतिषावर बलात्कार प्रकरणी टीव्ही कलाकार करण ओबेरॉयला अटक - police
करणने त्याच्या मुंबई स्थित घरी बोलावून लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर त्याने सतत या महिलेशी शरीरसंबंध ठेवून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
![महिला ज्योतिषावर बलात्कार प्रकरणी टीव्ही कलाकार करण ओबेरॉयला अटक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3203804-159-3203804-1557132331919.jpg)
बलात्कार प्रकरणी टीव्ही कलाकार करण ओबेरॉयला अटक
गेल्या काही दिवसांपासून करण ओबेरॉय हा त्याच्याजवळील अश्लील व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत पीडित तक्रादार माहिलेकडे सतत पैशांची मागणी करीत होता. या गोष्टीला कंटाळून शेवटी पीडित महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी खंडणी आणि बलात्काराच्या गुन्ह्यात करण ओबेरॉयला अटक केली आहे.