महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पत्रकारांच्या रंगपंचमीत राणादा आणि अंजलीने उधळले रंग - Rangpanchami

रंगपंचमीचा सण कोल्हापूरात उत्साहात साजरा होतो. देशात आणि राज्यात धुलीवंदनादिवशी रंग उधळण्याची परंपरा असली तरी पश्चिम महाराष्ट्रात हा सण रंगपंचमी दिवशी रंग उधळले जातात. याच रंगात रंगले तुझ्यात जीव रंगलाचे राणादा आणि पाठकबाई.

राणादा आणि अंजलीने उधळले रंग

By

Published : Mar 25, 2019, 4:44 PM IST

Updated : Mar 25, 2019, 9:06 PM IST


तुझ्यात जीव रंगला मालिकेतील चालतय की म्हणणारा राणा आणि अंजली हे कोल्हापूर प्रेस क्लबच्या रंगपंचमीत सहभागी सहभागी झाले होते. यावेळी प्रेस क्लब चे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर, सर्व पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.

पत्रकारांच्या रंगपंचमीत राणादा आणि अंजलीने उधळले रंग

गेले तीन वर्षे कोल्हापुरात त्यांच्या या तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे शूटिंग सुरू आहे मात्र कधीच त्यांनी आशा प्रकारे रंगपंचमीचा आनंद इथे घेतला नाही पण आज मात्र शुटिंगचे सगळे शेड्युल बाजूला ठेऊन त्यांनी रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला... शिवाय सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या.

Last Updated : Mar 25, 2019, 9:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details