आज राम नवमी. यावर्षी देखील कोरोना संकटामुळे नवरात्रीत मोठा उत्सव साजरा करता आला नाही. दिवंगत गुलशन कुमार यांनी त्यांची सांगीतिक घोडदौड भक्ती संगीताने केली होती आणि त्यांची मुलगी तुलसी कुमार ती परंपरा जोपासून आहे. म्हणजे तुलसी अनेक प्रकारची गाणी गाते परंतु तिला भक्ती संगीतात जास्त आनंद मिळतो. तुलसी कुमारला यावर्षीच्या नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, वैष्णो देवी मंदिरात गाण्याची संधी मिळाल्यामुळे तिला धन्य धन्य झाले आहे. पारंपारिक नवरात्रीच्या ७ व्या दिवशी देवी दुर्गाच्या ९ अवतारांपैकी एक असलेल्या देवी कात्यायनीची भक्त पूजा करतात आणि या निमित्ताने अष्टपैलू आणि प्रसिद्ध गायिका तुलसी कुमारने आपल्या गायनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
या प्रसंगी बोलताना तुलसी कुमार म्हणाली, "सध्या ज्या कठीण परिस्थितीला आपण तोंड देत आहोत त्या काळात मला वाटतं की सण आपल्याला एकत्र आणतात, आणि ते केवळ आशेचा आत्मा म्हणूनच काम करत नाहीत तर प्रार्थना करत असताना देवाकडून आशीर्वाद मिळवण्यास मदत करतात. मी फेब्रुवारीला माता राणीला भेटायला गेले होते आणि एका महिन्यातच मला नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर माता राणीच्या घरी पुन्हा बोलावणे आले, गायन सादर करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी खूप खूष आहे."
ती पुढे म्हणाली, “मी देवी वैष्णो देवीची एक महान भक्त आहे आणि देवीच्या मंदिरात गात वर्षाची सुरुवात करणे यापेक्षा चांगले काय असू शकते. मला आनंद आहे की मी या टाळेबंदीत देवी दुर्गासाठी या पवित्र ठिकाणी एक गाणे गायले आहे. लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि संकटाला सकारात्मक मार्गाने तोंड देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. गाणे सादर करण्याआधी आम्ही सुनिश्चित केले होते की सर्व आवश्यक खबरदारीचे पालन केले आहे आणि सामाजिक अंतर राखले आहे.”