मुंबई - गेल्या काही दशकांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती लोप पाऊ लागली आणि एकलं कुटुंब पद्धती अवलंबिली जाऊ लागली. प्रत्येक कुटुंब पद्धतीत काहींना काही त्रुटी असल्या तरी एकत्र कुटुंब पद्धतीतील जेष्ठांचा अनुभव आणि जिव्हाळा तरुणाईला पुन्हा तिथे ओढतोय. एकत्र कुटुंबपद्धतीला पुन्हा एकदा फोकस मध्ये आणणारी मालिका म्हणजे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
या मालिकेतल्या मोठ्या बाई म्हणजे प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आई, जाऊ, सून आणि एक उत्तम अन्नपूर्णा. या मालिकेतील इतर व्यक्तिरेखांप्रमाणेच मोठी बाई ही भूमिका देखील गाजतेय. ही भूमिका अभिनेत्री अंजली जोशी अगदी चोख बजावत आहेत. या मालिकेत एकत्र कुटुंबपद्धती खूप सुंदररित्या दाखवण्यात आली आहे. एकत्र कुटुंबपद्धती बोलताना स्वतःच्या खाजगी आयुष्यातील अनुभवाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, "मी लग्नानंतर एकत्र कुटुंबात आले आणि मालिके प्रमाणेच मी खऱ्या आयुष्यात देखील मोठी जाऊ आहे. माझ्या लग्नाच्या एका वर्षभरात २ लहान जावा देखील कुटुंबात आल्या. त्यामुळे सासू सासरे, मी माझे पती आणि माझे २ दीर आणि जावा असे आम्ही सगळे एकत्र राहत होतो.”