महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दर्शवित छत्रपती शिवरायांना मानवंदना! - Swarajya Saudamini Tararani

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या कर्तुत्वाला आणि दातृत्वाला मानवंदना देण्यासाठी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेच्या कलाकारांनीही सेटवर आगळी शिवजयंती साजरी केली. दांडपट्टा, काठीचे खेळ इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके यावेळी लहानग्यांनी सादर केली.

स्वराज्य सौदामिनी ताराराणी
स्वराज्य सौदामिनी ताराराणी

By

Published : Feb 19, 2022, 2:51 PM IST

Updated : Feb 19, 2022, 6:34 PM IST

डॉ.अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मिती संस्थेने आजवर वेगववेगळ्या मालिकांच्या माध्यमातून हा इतिहास आपल्यापर्यंत पोहचवला आहे. येणाऱ्या प्रत्येक पिढीला हा इतिहास सांगण्याचे दायित्व आपल्याकडे आहेच. फक्त वेगवेगळ्या माध्यमातून तो अधिक जोरकसपणे पोहचवणे महत्त्वाचे असल्याचे ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेचे निर्माते घनश्यामराव यांनी यावेळी सांगितले.

शिवरायांस आठवावे । जिवित्व तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी रहावे । किर्तीरूपी ।।
शिवरायांचे कैसे चालणे । शिवरायांचे कैसे बोलणे ।
शिवरायांचे सलगी देणे कैसे असे ।।
शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप
शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी ।।

समर्थांच्या या ओळीतून छत्रपती शिवाजी महाराज यांची महती स्पष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या कर्तुत्वाला आणि दातृत्वाला मानवंदना देण्यासाठी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेच्या कलाकारांनीही सेटवर आगळी शिवजयंती साजरी केली. दांडपट्टा, काठीचे खेळ इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके यावेळी लहानग्यांनी सादर केली. उपस्थित कलाकारांनी छत्रपती शिवरायांना वंदन करून शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर उभा केलेला आदर्श आणि शिकवण यांचे आचरण करण्याची शक्ती मिळावी अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.

सोनी मराठी वाहिनीवर' ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका सुरू आहे. कार्तिक केंढे या मालिकेचे दिग्दर्शन करीत आहेत. या मालिकेत स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ च्या भूमिकेत स्वरदा थिगळे असून छत्रपती राजाराम राजेंची दमदार भूमिका अभिनेता संग्राम समेळने साकारली आहे. यतीन कार्येकर यांनी औरंगजेबाची भूमिका केली आहे.

हेही वाचा -Bal Shivaji: ‘बाल शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन करणार रवी जाधव

Last Updated : Feb 19, 2022, 6:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details