महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘त्रिभंगा’चा ट्रेलर: आई मुलीच्या नात्याची अनोखी कहाणी - मिथीला पालकर

नेटफ्लिक्सच्या आगामी ‘त्रिभंगा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रेणुका शहाणे दिग्दर्शित या चित्रपटाची कथा तीन महिलांभोवती गुंफण्यात आली आहे. 15 जानेवारीला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहेत.

Tribhanga trailer
‘त्रिभंगा’चा ट्रेलर

By

Published : Jan 4, 2021, 3:38 PM IST

मुंबई - 'त्रिभंगा' या नव्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. आई आणि मुलीच्या नात्याची ही कथा आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रेणुका शहाणे यांनी केले आहे.

रेणुकाने यैा चित्रपटात तीन पिढ्यांची कथा गुंफली आहे. ट्रेलरवरुन दिसते की काजेल एका ओडिसी नृत्यांगणेचे काम करीत असून तिचे आईसोबतचे नाते ताणलेले आहे. स्वतःच्या घरात ती सुरक्षित समजत नाही. या चित्रपटात मिथीला पालकरची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तन्वी आझमी यांनी काजोलच्या आईची भूमिका साकारली.

हेही वाचा - 'बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ' उर्मिलाचे ट्विट

'त्रिभंगा'मध्ये कुणाल रॉय कपूर, कंवलजीत सिंग, मानव गोहिल आणि वैभव तत्ववादी हेदेखील आहेत. 15 जानेवारीला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details