महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘कारभारी लयभारी’ मालिकेतील ट्रान्सजेंडर कलाकारला घाटकोपरमध्ये मारहाण - Akash Dilip arrested

‘कारभारी लयभारी’ या मालिकेतील ट्रान्सजेंडर कलाकारला घाटकोपरमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली होती. अखेर या प्रकरणी आता पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तृतीय पंथी आरोपी आकाश दिलीप माटेला बेड्या ठोकल्या आहेत.

transgender-actor
कलाकारला घाटकोपरमध्ये मारहाण

By

Published : Mar 2, 2021, 4:03 PM IST

मुंबई - मराठी वाहिनीवरील ‘कारभारी लयभारी’ या मालिकेतील ट्रान्सजेंडर कलाकारला घाटकोपरमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ट्रान्सजेंडर असलेल्या गंगा ऊर्फ प्रणित हाटे यांना २५ फेब्रुवारीला रात्री साडे दहा वाजता घाटकोपर रमाबाई नगर इथे अज्ञात तृतीय पंथीकडून भर रस्त्यात मारहाण झाली होती. गंगाने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. या व्हिडीओत ती खूप घाबरलेल्या आणि रडत रडत माहिती देत होती.

कलाकारला घाटकोपरमध्ये मारहाण
अखेर या प्रकरणी आता पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तृतीय पंथी आरोपी आकाश दिलीप माटेला बेड्या ठोकल्या आहेत. गंगा आपल्या मित्राला नाशीकला सोडण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्गावर आल्या होत्या. त्या ठिकाणी उभ्या असताना तिथे आरोपी तृतीय पंथी आकाश आला आणि तू कोणत्या ग्रुपचा, तुझा गुरू कोण ? केस का वाढवलेत? असे प्रश्न विचारू लागला. यानंतर त्याला मारहाण करीत त्याचे पैसेदेखील काढून घेण्यात आले.कसी तरी सुटका करीत त्यांनी तिथून पळ काढला आणि झालेली घटना व्हिडीओ बनवून इन्स्टाग्राम वर टाकली होती. प्रथम पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. मात्र समाज माध्यमातून या बाबत टीकेची झोड उठल्यावर अखेर काल पंत नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी आकाश माटेला अटक केली आहे. काहीच दिवसांपूर्वी चार तृतीयपंथीनी याच विभागात पोलिसांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता ही घटना देखील धक्कादायक आहे.हेही वाचा - हॅप्पी बर्थ डे टायगर श्रॉफ : बागी ते रॅम्बो पर्यंतचा अॅक्शन प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details