महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तैश' या थरारपटाचा ट्रेलर रिलीज, २९ ऑक्टोबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Directed by Bejoy Nambiar

'तैश' या थरारपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अत्यंत वेगवान अॅक्शन दृष्ये असलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. रिव्हेंज ड्रामा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन बेजॉय नंबीयार यांनी केले आहे.

trailer release of the thriller 'Taish'
'तैश' या थरारपटाचा ट्रेलर

By

Published : Oct 16, 2020, 9:21 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता हर्षवर्धन राणे, अमित सध आणि जिम सर्भ असे दिग्गज कलाकार असलेल्या 'तैश' या थरारपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अत्यंत वेगवान अॅक्शन दृष्ये असलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. रिव्हेंज ड्रामा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन बेजॉय नंबीयार यांनी केले आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हा ट्रेलर आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

बिजॉय या चित्रपटाच्या कथेवर बेजॉय नंबीयार बऱ्याच दिवसापासून काम करत होते. 'तैश' चित्रपटाची निर्मिती निशांत पिट्टी आणि बेजॉय नंबीयार हेच करणार आहेत. हर्षवर्धन 'सनम तेरी कसम' या चित्रपटानंतर बऱ्याच काळापासून चित्रपटापासून लांब होता. जिम सर्भ हा 'पद्मावत' या चित्रपटात झळकला होता. तर अमित संधने सलमान खानसोबत 'सुलतान' चित्रपटात भूमिका साकारली होती. आता तिघेही 'तैश' चित्रपटात काय कमाल दाखवतात, याची उत्सुकता ट्रेलर पाहून निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details