महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने एक कोटी सबस्क्राइबर्सचा आकडा केला पार!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने एक कोटी सबस्क्राइबर्सचा आकडा पार केला आहे. त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलला चाहत्यांकडून खूप प्रेम आणि प्रशंसा प्राप्त होत आहे. यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा शोचे निर्माते श्री. असित कुमार मोदी प्रचंड खुश आहेत.

TMKOC's official YouTube channel crosses 10M+ subscribers
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने एक कोटी सबस्क्राइबर्स चा आकडा केला पार!

By

Published : Oct 18, 2021, 7:33 AM IST

मुंबई - ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा विनोदी कार्यक्रम गेली १३ वर्षे आपल्या निखळ विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. एका तपापासून हास्य, प्रेम आणि मनोरंजनाचा प्रसार करीत हा शो आज निःसंशयपणे देशाचा सर्वाधिक आवडता फॅमिली शो झाला आहे. हा भारतातील एकमात्र फॅमिली टीव्ही शो आहे. जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन करीत आहे. आनंदाची बातमी म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने एक कोटी सबस्क्राइबर्सचा आकडा पार केला आहे. त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलला चाहत्यांकडून खूप प्रेम आणि प्रशंसा प्राप्त होत आहे. यामुळे तारक मेहता का उल्टा चष्मा शोचे निर्माते श्री. असित कुमार मोदी प्रचंड खुश आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा 28 जुलै 2008 रोजी प्रथमच सब टीव्ही, सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियावर प्रसारित झाला. नीला फिल्म प्रॉडक्शन्स प्राइवेट लिमिटेड प्रस्तुत भारताचा सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) ने नुकतेच 3200 ‘हॅपीसोड्स’ पूर्ण केले आहेत. या शो मधील गोकुळधाम सोसायटी आज इतकी प्रसिद्ध झाली आहे कि ती 'मिनी इंडिया' म्हणून ओळखली जाते.

नीला फिल्म प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) आठवड्यातून सहा दिवस, सोमवार ते शनिवार सोनी सब वर रात्री 8.30 वाजता नवीन भागांसह प्रसारित होईल. विशेष 'महासंगम शनिवार' घोषणेच्या अंतर्गत आता प्रोग्रामिंग आठवड्यातून सहा दिवसांवर वाढवण्याचा निर्णय सोनी सब वाहिनीने घेतला आहे. जगातील सर्वाधिक वर्षे चालू असणारा हा एकमेव विनोदी शो आहे. हा दैनिक कॉमेडी शो आता चौदाव्या वर्षात असून ३२०० पेक्षा अधिक भागांसह अखंडपणे प्रसारित होत आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा श्री. असित कुमार मोदी द्वारा लिखित आणि निर्मित आहे. हा कार्यक्रम मराठीत गोकुळधामची दुनियादारी आणि तेलुगू भाषेत तारक मामा अय्यो रामा म्हणून युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details