महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रेरणादायी कथांना सलामी देणारे गीत ‘मैं शेरनी‘ झाले प्रदर्शित! - amit masurkar

विद्या बालन चा शेरनी या चित्रपटातील नुकतेच मै शेरनी हे गाणे प्रसारित झाले आहे. या गाण्यात चार 'शेरनी' दिसणार आहेत - मिरा एर्डा, नताशा नोएल, इश्ना कुट्टी, त्रिनेत्रा हलदार. अमेझॉन प्राइम म्युझिक, स्पॉटीफाय, गाना, सावन, विंक अशा सर्व म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर १५ जून रोजी हे गाणे उपलब्ध होईल.

mai sherani
mai sherani

By

Published : Jun 16, 2021, 8:08 AM IST

मुंबई -विद्या बालन अभिनित ‘शेरनी’ प्रदर्शनासाठी सज्ज होत असताना निर्मात्यांनी स्त्रीसमुदायाला प्रोत्साहित करणारे एक गाणे प्रदर्शित केले. ‘मैं शेरनी’ असे या गाण्याचे शीर्षक असून यात तगून राहण्याच्या प्रेरणादायी कथांना सलामी देण्यात आली आहे. अकासा आणि रफ्तार यांनी गायलेल्या या गाण्यात विद्या बालनसोबत प्रत्यक्ष आयुष्यातील चार 'शेरनी' दिसणार आहेत - मिरा एर्डा, नताशा नोएल, इश्ना कुट्टी, त्रिनेत्रा हलदार.

sherani
गायिका अकासा म्हणाली, "स्त्री आणि तिच्यातील ताकदीला सलाम करणाऱ्या गाण्याचा भाग असणं ही माझ्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. या गाण्यातून जगातील प्रत्येक स्त्रीमध्ये असलेल्या वाघिणीला जागृत करता येईल. कधीही हार न मानता स्वप्नांचा वेध घेण्याची आणि सतत मेहनत करण्याची प्रेरणा देता येईल, अशी आम्हाला आशा आहे. मी नेहमीच स्त्रीशक्तीला पाठिंबा दिला आहे. शेरनीचा भाग असणं कायम लक्षात राहील असं गीत गाणं हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. या दमदार गाण्यासाठी रफ्तारसोबत काम करताना छान वाटलं. हे बोल, त्यातील संगीत माझ्याशी संवाद साधतात आणि हा सिनेमा काय सांगू पाहतो त्याचा अनुभव श्रोत्यांना या गाण्यातून येईल, अशी मला खात्री आहे."या म्युझिक व्हिडीओमध्ये मिरा एर्डा (F4 रेसर आणि ड्रायव्हर कोच), नताशा नोएल (बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्ल्युएन्सर आणि योगा ट्रेनर), एश्ना कुट्टी (सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि हुला-हूप डान्सर) आणि त्रिनेत्रा हलदार (कर्नाटकातील पहिली ट्रान्सजेंडर डॉक्टर), जयश्री माने (बी.वाय.एल नायर हॉस्पिटलमधील आघाडीची लढवय्यी), रिद्धी आर्या (आघाडीच्या लढवय्यांना जेवण पुरवणारी विद्यार्थिनी), अनिता देवी (सुरक्षा रक्षक), सीमा दुग्गल (शिक्षिका), अर्चना जाधव (घरकाम) यांच्यासोबत विद्या बालन दिसणार आहे. राघव यांनी लिहिलेले 'मैं शेरनी' या गाण्याला उत्कर्ष धोतेकर यांनी संगीत दिले आहे. अमेझॉन प्राइम म्युझिक, स्पॉटीफाय, गाना, सावन, विंक अशा सर्व म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर १५ जून रोजी हे गाणे उपलब्ध होईल.
विद्या बालनचा चित्रपट
या गाण्याबाबत अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, "कधीही हार न मानण्याची अमर्याद जिद्द बाळगणाऱ्या जगभरातील महिलांना आम्ही दिलेली सलामी म्हणजे ‘मैं शेरनी’ हा म्युझिक व्हिडीओ. शेरनी आम्हा सर्वांसाठी फार खास आहे आणि हा सिनेमा आणि म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही अशा महिलांना वंदन करतो ज्यांनी दाखवून दिले की महिला करू शकणार नाहीत असं काहीच नसतं. या सिनेमातील माझी व्यक्तिरेखा विद्या विन्सेट मधून आम्हाला दाखवायचं आहे की स्त्री निर्भय असते, ताकदवान असते. वाघिण असण्यासाठी डरकाळीच फोडायला हवी, असं नाही. अँथम बनलेल्या या गाण्यातून आम्ही हेच दाखवू पाहतोय."शेरनी हा विद्या बालनच्या वेगळ्या धाटणीचा नाट्यमय सिनेमातील 'मैं शेरनी' गाण्यात विद्या बालनसह काही अनोख्या व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया आहेत. तगून राहण्याच्या जिद्दीची यशोगाथा मांडणारे हे खास गाणे अकासा आणि रफ्तार यांनी गायले आहे. पारंपरिक समजुतींना मोडीत काढत सर्व आव्हानांविरोधात ठामपणे उभे राहत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या शेरनींच्या साहसाला या गाण्यातून सलाम करण्यात आला आहे.रॅपर रफ्तार म्हणाला, "शेरनी हा माझ्यासाठी फार छान प्रोजेक्ट होता. या एका शब्दात प्रचंड ताकद आहे आणि या शब्दाचं महत्त्व गाण्यातून दाखवून देणं हे एक मोठं आव्हान होतं. अकासा आणि मी ते करू शकलो आहोत, अशी आशा आहे. मी आणि अकासाने अगदी जीव ओतून यासाठी काम केलंय आणि आमची ही जिद्द यात उतरली याचा मला खरंच आनंद आहे."‘शेरनी’ येत्या १८ जून पासून भारत आणि २४० हून अधिक देश आणि प्रांतातील प्रेक्षकांना अमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम करता येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details