महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

टिकटॉक स्टार सिया कक्कडची आत्महत्या, चाहत्यांना धक्का - Tiktok star Sia Kakkad suicide

टिकटॉक स्टार सिया कक्कड हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आली आहे. १६ वर्षे वयाची ही तारका सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Siya
टिकटॉक स्टार सिया कक्कडची आत्महत्या

By

Published : Jun 25, 2020, 8:13 PM IST

Updated : Jun 25, 2020, 8:23 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने अजून लोक सावरलेले नाहीत तोवर टिकटॉक स्टार सिया कक्कड हिने आत्महत्या केल्याची बातमी आली आहे. केवळ १६ वर्ष वय असलेल्या सियाने आपले जीवन संपवले. तिच्या मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आत्महत्या करण्यापूर्वी सिया हिने आपले मॅनेजर अर्जुन सरीन यांच्यासोबत बोलणे केले होते. अर्जुन यांचे म्हणणे आहे की, सिया एकदम ठिक होती आणि कोणत्याही त्रासात वाटत नव्हती. त्यांनाही कळत नाही की, सियाने असे पाऊल का उचलले. काही तासापूर्वीच सियाने आपला डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या गाण्यात ती पंजाबी गाण्यावर नाचताना दिसते. काही दिवसापूर्वी तिने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केला होता.

टिकटॉक स्टार सिया कक्कड हिचे इन्स्टाग्रामवर एक लाख फॉलोअर्स आहेत. सियाच्या मृत्यूने सर्वचजण चकित झाले आहेत. त्यांना विश्वासच बसत नाही की तिने आत्महत्या केली आहे. तिचे फॅन्स इन्स्टावर कॉमेंट्स करुन श्रध्दांजली देत आहेत.

हेही वाचा - सुशांतसिंह राजपूतचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' 'इथं' होणार रिलीज

सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवाही पसरल्या होत्या. सिया कक्कड ही बॉलिवूडची प्रसिध्द गायिका नेहा कक्कड हिची नातेवाईक असल्याचे सांगितले जात होते. मात्र ही अफवा होती. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने देश दुःखात असताना या उगवत्या तारकाचा झालेला अस्त मनाला चटका लावणारा आहे.

Last Updated : Jun 25, 2020, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details