‘अनबिलीव्हेबल’ व ‘कॅसानोवा’ सारखी आंग्ल भाषेतील गाणी गायल्यावर अभिनेता टायगर श्रॉफने आपले पहिले वहिले हिंदी गाणं गायलं आहे. ‘वंदे मातरम’ असे त्या गाण्याचे शीर्षक असून ते भारतीयांच्या देशभक्तीच्या भावनेचा उत्सव आहे आणि देशाच्या संरक्षण दलांना सलाम करते. टायगर श्रॉफने गायलेले हे गाणे विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केले आहे आणि चित्रपट निर्माते-नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट-दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी दिग्दर्शित केले आहे. कौशल किशोर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे. त्यात दिल्लीच्या अमर जवान ज्योतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची दृश्येही आहेत. या गाण्यात टायगर श्रॉफने आपल्या पदलालित्याने चार चांद लावले आहेत.
टाइगर श्रॉफसोबत जॅकी भगनानीने स्वतंत्रता दिवसाच्या निमित्ताने 'वंदे मातरम' हे गाणे प्रत्येक भारतीयाला समर्पित केले असून निर्माता जॅकी भगनानीने ते प्रदर्शित केले. टाइगर श्रॉफसोबत जॅकी भगनानीच्या ‘जे जस्ट म्यूजिक’ ने ‘वंदे मातरम’ रिलीज केले असून यासोबत त्याने हिंदी गाण्यातुन आपला डेब्यू केला आहे.
जॅकी भगनानीने आपल्या सोशल मीडियावर शेयर करत लिहिले, "हे गाणे आपल्या गौरवशाली राष्ट्र आणि त्याच्या लोकांच्या संरक्षण दलांना समर्पित आहे. मोठ्या सन्मानाने आणि अभिमानाने, आम्ही तुम्हाला हे खास समर्पण सादर करतो. -#वंदेमातरम."