मुंबई - अॅक्शन स्टार टायगर श्रॉफने तिसऱ्यांदा गायक म्हणून स्वतःला सिध्द केले आहे. यापूर्वी अनबिलिव्हेबल आणि कॅसीनोव्हा ही दोन गाणी हिट झाल्यानंतर टायगर श्रॉफने वंदे मातरम या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 10 ऑगस्ट रोजी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वंदे मातरमचे दिग्दर्शन रेमो डिसूझा यांनी केले आहे आणि जॅकी भगनानीच्या जस्ट म्युझिकने याची निर्मिती केली आहे.
टायगरने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर फर्ट लूक शेअर करीत या गाण्याविषयी लिहिले आहे, "मी पहिल्यांदाच अशा प्रकारचे गाणे गाण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे वंदे मातरम हे माझे नवे गाणे तुम्हाला शेअर करताना एकाचवेळी उत्साही आणि नर्व्हसही आहे. हे केवळ गाणे नाही तर ही एक स्वतंत्र भारत दिवस साजरा करीत असतानाची एक भावना आहे. आपल्या भारत देशाला, मानवंदना देण्यासाठी हे खास गाणे शेअर करीत आहे. 10 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे."