महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'द कपिल शर्मा शो'मध्ये टायगरच्या गायनाने प्रेक्षक झाले चकित - Tigar Shroff in news

'द कपील शर्मा शो'मध्ये टायगर श्रॉफचा नवा गुण सर्वांसमोर आला. तो जितका स्टंट चांगला करतो तितकाच त्याचा आवाजही सुंदर आहे याचा प्रत्यय प्रेक्षकांना आला.

टायगर श्रॉफ

By

Published : Sep 25, 2019, 5:58 PM IST


'द कपील शर्मा शो'मध्ये येणारा प्रत्येक सेलेब्रिटी काही तरी नवे करून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असतो. या शोमध्ये आगामी 'वॉर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगर श्रॉफ आला होता. आता टायगर आलाय म्हटल्यानंतर त्याच्याकडून प्रेक्षक एखाद्या स्टंटची अपेक्षा नक्कीच करू शकतात. परंतु, यावेळी वेगळेच घडले.

कपील शर्माने टायगरच्या हाती माईक देत त्याला गायन करण्याची इच्छा बोलून दाखवली. टायगर कसे गातो? याची कुणालाच खात्री नसल्यामुळे प्रेक्षकांनी कान टवकारले आणि जेव्हा त्याचा आवाज घुमला तेव्हा ते स्तब्ध झाले. गाणे संपल्यानंतर प्रेक्षकांनी सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

कपीलच्या शोमधील हा टायगर गात असतानाचा व्हिडिओ सोनी टीव्हीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. टायगरचे चाहते त्याला भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

'वॉर' या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि ह्रतिक रोशनची जोडी पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. भरपूर अॅक्शन आणि वेगवान स्टंट्स यात पाहायला मिळतील याची जाणीव 'वॉर'चा ट्रेलर पाहून झाली आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या या सिनेमातील 'जय जय शिव शंकर'या गाण्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. २ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय.

ABOUT THE AUTHOR

...view details