नवी दिल्ली - भारतात करोडो लोक टिकटॉकचा वापर पूर्वी पासूनच करीत आहेत. त्या सर्वांना हा अॅप इतरांना शेअर करण्याची सुविधा आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल अॅप स्टोअरवरुन याला रोकने वांझोटा प्रकार ठरु शकतो, असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.
टिकटॉक मुलांच्यामध्येदेखील खूप लोकप्रिय आहे. परंतु यातील 'पोर्नग्राफिक कंटेंट'चा प्रसार होत असल्याबद्दल टीका होत आहे.
सरकारच्या सूचनेवरुन गुगल आणि अॅपलने चीनी शॉर्ट व्हिडिओ शेअरींग अॅप डाऊनलोड करण्यावर बंदी घातली आहे.