महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘रात्रीस खेळ चाले’ भाग १, २, ३ म्हणजे पाप...शाप...आणि उ:शाप! - थ्रिलर मालिका ‘रात्रीस खेळ चाले’

‘रात्रीस खेळ चाले’ या थ्रिलर मालिकेचा तिसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीस आलीा आहे. दोन्ही भागंना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या मालिकेची लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत क्रेझ आहे. आता ‘अण्णा नाईक’ परत आलेत याची सर्वत्र चर्चा आहे.

'Ratris Khel Chale
‘रात्रीस खेळ चाले

By

Published : Mar 23, 2021, 7:57 PM IST

मुंबई - छोट्या पडद्यावर शक्यतो कौटुंबिक वा फारफार तर विनोदी मालिकांचे वर्चस्व आहे. परंतु ‘रात्रीस खेळ चाले’ ही सस्पेन्स-थ्रिलर मालिका अनपेक्षितपणे यशस्वी ठरली, तेव्हा या जॉनर कडे निर्माते गांभीर्याने बघू लागले. त्यामुळेच ‘रात्रीस खेळ चाले’चा दुसरा भाग आला व तोही खूप आवडला गेला. खासकरून त्यातील शेवंता आणि अण्णा नाईक ही पात्रे. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत अण्णा नाईकांची क्रेझ आहे. आता ‘अण्णा नाईक’ परत आलेत याची सर्वत्र चर्चा आहे.

‘रात्रीस खेळ चाले
पाप आणि शाप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका पिढीने केलेलं पाप दुसऱ्या पिढीला शाप म्हणून भोगावं लागतं. परंतु पूर्वजांच्या, पूर्व पुण्याईने घराण्यातल्या सत्शील माणसाकरवी त्या शापित घराण्याला उ:शाप मिळत असतो. पण त्या उ:शापासाठी घराण्यातल्या सच्छील व्यक्तीला खूप यातना सोसाव्या लागतात. त्याग करावे लागतात आणि त्यानंतरच ते घराणं शाप मुक्त होतं. म्हणजेच त्या घराण्याचा पाप...शाप...आणि उ:शाप असा एक प्रवास सुरू होतो. ‘रात्रीस खेळ चाले २’ मध्ये अण्णा, माई, शेवंता या पात्रांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. आता ‘रात्रीस खेळ चाले ३’ येऊ घातलाय व त्यामध्ये काय असणार याचीच उत्सुकता सर्वाना आहे. या मालिकेचे लेखक राजेंद्र घाग यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ बद्दल सांगताना असे म्हटले की, ‘प्रत्येक घराण्याला एक इतिहास असतो. कोणी तो शोधतो तर कोणी शोधत नाही पण इतिहास हा असतोच. त्या त्या घराण्याचा मूळ पुरुष कोणीतरी असतो आणि त्याची वंशवेल पुढे नांदताना दिसते ज्याला आपण पीढी म्हणतो. अनेक पिढ्यांमधील एखाद्या पीढीत एखादा वंशज क्रूरकर्मा निपजतो. तो दुराचारी होऊन अराजक माजवतो. पूर्वजांनी नेमून दिलेले कुळाचार तो पायदळी तुडवतो. स्वार्थासाठी तो पुण्याची कास सोडून पापप्रवृत्त होतो. त्यामुळे त्याच्या हातून खून, व्यभिचार, व्यसनं असली पापं घडत जातात. पण त्याचे भोग त्याच्या सर्व कुटुंबाला भोगावे लागतात कारण ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो त्यांचे असंतुष्ट आत्मे त्या पापी माणसा बरोबर त्याच्या घराण्याला शाप देत असतात. अशाच एका नाईक घराण्याची "रात्रीस खेळ चाले" ही कथा.’‘अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली. अतृप्त आत्म्यांनी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको ईंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्री सुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्याची ही एक रंजक कथा’ असे राजेंद्र घाग पुढे म्हणाले. नाईक घराण्याचं पाप...शाप...आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच रात्रीस खेळ चाले भाग १, २, ३ असं म्हणता येईल. ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ११ वा. झी मराठीवर प्रसारित होते. हेही वाचा - अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओचा पहिलाच मराठी चित्रपट ‘पिकासो’ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित!

ABOUT THE AUTHOR

...view details