मुंबई -मागील वर्षी सोनाली बेंद्रेने तिला कँसर झाल्याची माहिती दिली होती. तिच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. कँसरवर उपचार घेण्यासाठी ती लंडन येथे गेली होती. त्यानंतर सुरु झाला तिचा कँसरशी लढण्याचा प्रवास. तिच्या या प्रवासातील प्रत्येक अपडेट तिने चाहत्यांशी शेअर केले आहेत.
इतर कँसरग्रस्तांसाठी सोनाली प्रेरणास्रोत बनली. मात्र, या आजारापेक्षा त्यावर केले जाणारे उपचार किती वेदनादायी होते, हे अलिकडेच तिने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
सोनाली डिसेंबर महिन्यातच आपल्यावरील उपचार संपवून मुंबईला परतली आहे. सोनालीला हायग्रेड कँसर झाला होता. त्यासाठी तिला वेगवेगळ्या केमोथेरपीच्या चक्रातून जावे लागले. मात्र, हे उपचार सुरु असताना ती जगेल की नाही, याची तिला शास्वती नव्हती. तरीही तिच्या कुटुंबाने आणि डॉक्टरांनी तिला धीर दिला. हे उपचार अत्यंत वेदनादायी होते, असे सोनालीने सांगितले.
सोनालीला तिचे केसही कापावे लागले होते. या सर्व कठीण परिस्थीतीला ती धैर्याने सामोरी गेली. तिच्यावरील उपचार पूर्णत: संपले नाहीत. मात्र, उपचारातून ब्रेक घेऊन ती भारतात परतली आहे. आता ती तिच्या मुलासोबत आणि मित्रमैत्रींणीसोबत वेळ घालवताना दिसते.