आपल्या पहाडी आवाजाने संगीतरसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारे गायक कैलाश खेर हे हिंदी चित्रपट संगीतक्षेत्रातील प्रतिष्ठित नाव आहे. त्यांनी गायलेल्या ‘अंदाज’ चित्रपटामधील गाण्याने ते नावारूपास आहे. त्यानंतर स्वदेस, मंगल पांडे, सरकार इत्यादी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करून त्यांनी अजूनही प्रसिद्धी मिळविली. कैलाश खेर यांना २००७ सालचा सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
हाच पहाडी आवाज आता मराठी मालिका ‘गाथा नवनाथांची' मधून दुमदुमणार आहे. या मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रख्यात गायक कैलाश खेर यांच्या आवाजात हे शीर्षकगीत प्रेक्षकांना रोज ऐकायला मिळणार आहे. नवनाथांचा महिमा आणि त्यांची ख्याती या मालिकेबरोबरच या शीर्षगीतामुळेसुद्धा लोकांपर्यंत पोचणार आहे.