महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिग बॉस मराठीमध्ये पोहोचली ‘झिम्मा’ ची टीम, धमाल मस्तीला उधान - Bigg Boss Marathi 'Mission Nomination'

बिग बॉस मराठीच्या (BBM 3) घराला अधनं मधनं पाहुणे भेट देत असतात. यावेळेस ‘झिम्मा’ या चित्रपटाचे कलाकार घरामध्ये सदस्यांना भेटायला आले. त्यांनी सदस्यांसोबत धम्माल मस्ती केली आणि घरातील वातावरण रिफ्रेश झाले. क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, निर्मिती सावंत, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकणी यांनी एकमेकांना खो देत या घरात हजेरी लावली.

बिग बॉस मराठी 3
बिग बॉस मराठी 3

By

Published : Nov 17, 2021, 2:57 PM IST

बिग बॉस मराठीच्या (BBM 3) घराला अधनं मधनं पाहुणे भेट देत असतात. यावेळेस ‘झिम्मा’ या चित्रपटाचे कलाकार घरामध्ये सदस्यांना भेटायला आले. त्यांनी सदस्यांसोबत धम्माल मस्ती केली आणि घरातील वातावरण रिफ्रेश झाले. पाहुण्यांसाठी घरातील सदस्यांनी डान्स केला, पाहुण्यांनी त्यांना गेम खेळविले, एक ना अनेक गोष्टी घडल्या. क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, निर्मिती सावंत, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकणी यांनी एकमेकांना खो देत या घरात हजेरी लावली.

बिग बॉस मराठी 3

सोनाली कुलकर्णी म्हणाली की, ‘माझं स्वप्नं होतं...की बिग बॉस ने त्यांच्या भारदस्त आवाजात माझं नाव घ्यावं. ती काही अंशी पूर्ण झालंय. खरंतर मी ही फिल्म केली... लंडनला जाऊन शूट करायला मिळेल, चांगला सिनेमा, रोल आहे यामुळे नाही, तर मला माहिती होतं याचं प्रोमोशन बिग बॉस मध्ये होणार...” यावर एकाच हशा पिकला. तिने तिच्या सहकाऱ्यांसोबत घरातील सदस्यांकडून फन-टास्क्स करून घेतले.

बिग बॉस मराठी 3

‘मिशन नॉमिनेशन’ मध्ये हे स्नेहा, उत्कर्ष, गायत्री, मीरा, दादूस, सोनाली हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले आहेत. बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

हेही वाचा - Aniket VishwasRao : मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावसह तिघांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details