‘होम मिनिस्टर घरच्याघरी’ च्या येणाऱ्या विशेष भागामध्ये आदेश बांदेकर , “कोरोना वॉरीयर्स” सोबत पैठणीचा खेळ खेळणार आहेत. हे ते वॉरीयर्स आहेत ज्यांनी स्वतःच्या घरची किंवा घरच्यांची काळजी न करता इतरांचा जीव वाचवण्यासाठी सतत झटत राहिले. त्यांचा सन्मान आणि त्यांना थोडासा आनंद देण्याचा होम मिनिस्टरचा हा प्रयत्न आहे.
'होम मिनिस्टर घरच्याघरी' मधून उलगडणार कोरोना योद्ध्यांच्या कथा - होम मिनिस्टर घरच्याघरी
‘होम मिनिस्टर घरच्याघरी’ च्या विशेष भागामध्ये मध्ये आदेश बांदेकर , “कोरोना वॉरीयर्स” सोबत पैठणीचा खेळ खेळणार आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचा जीव वाचवण्यासाठी लढलेल्या कोरोना योध्यांना आपल्याला पाहाता येणार आहे.
कोरोनाच्या प्रदूर्भावाच्या काळात जनतेची घेतलेली काळजी आणि सोबत घरच्यांसोबत कराव्या लागलेल्या तडजोडी, प्रसंगी जीवावर उदार होऊन बजावलेलं कर्तव्य हे सारं या खास भागांमधून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.
‘होम मिनिस्टर घरच्याघरी’ चे हे विशेष भाग २७ जुलै पासून सुरू होणार आहेत. कोरोना वॉरीयर्सच्या गोष्टी ऐकताना त्यांनी केलेल काम हे कौतुकास्पद आहेच. पण प्रसंगी आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावणारे देखील आहे. या योध्याना भेटून आजवर लोकांसमोर आल्या नसलेल्या त्याच्या कहाण्या या निमित्ताने प्रथमच लोकांपुढे उलगडणार आहेत.