मड्डाराम गेली दोन वर्षांपासून क्रिकेट खेळतो आहे... पण गेल्या काही दिवसात त्याचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.यातून त्याने लोकांचे लक्ष वेधले आणि पाहता पाहता तो जगभर पसरला. त्याच्या व्हिडिओने फक्त सामान्य लोकांनाच प्रेरित केले नाही तर सचिन तेंडूलकरनेही त्याचा व्हिडिओ नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ट्विट करीत त्याचे कौतुक केले.
क्रिकेटचा देव सचिनही झालाय या मड्डारामवर फिदा...!!
क्रिकेट किती पातळीपर्यंत लोकांना वेडं बनवू शकतं याचं जीवंत उदाहरण आहे...बस्तरच्या दंतेवाडा जिल्ह्यातील एक बालक मड्डाराम कवासी...मड्डारामचे क्रिकेटबद्दलचं वेड असं काही आहे की, क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरही त्याचे कौतुक करताना थकला नाही. दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या मड्डारामला क्रिकेट खेळताना पाहून प्रत्येकजण चकित झाल्या शिवाय राहात नाहीत.
दंतोवाडा या नक्षल प्रभावीत जिल्ह्यातील बेंगलूर पंचायतमध्ये मड्डारामचे घर आहे. तो सातवीत शिकत आहे. तो नेहमी शाळेच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळताना दिसतो. मड्डारामला त्याच्या मित्रांचेही पूर्ण सहकार्य मिळतं. तो दिव्यांग असला तरी त्याच्यात क्रिकेट खेळण्याची इतकी जबरदस्त इच्छाशक्ती आहे, की त्याचे सहकारीही त्याच्यासोबत खेळताना आनंदित असतात. मड्डारामही आपल्या टीमला कधी निराश करीत नाही. त्याच्या क्रिकेटवरील प्रेमाकडे पाहून म्हटलं जातं की, मंझीले उन्हेंको मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से कुछ नाही होता, होसलोंसे उडान होती है.