महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'झी युवा' वाहिनीवर घुमणार 'ए लाव रे तो व्हिडीओ' चा आवाज - 'झी युवा' वाहिनी

लॉकडाऊनमध्ये घरी बसून सगळेच कंटाळले आहेत. पण, हा कंटाळा दूर करण्यासाठी अनेकांनी पर्याय निवडलाय, तो छंद जोपासण्याचा! तुम्ही सुद्धा, घरबसल्या तुमचं टॅलेंट आजमावत असाल, तर 'झी युवा' वाहिनी तुमच्यासाठी, एक संधी घेऊन आली आहे.

Zee Yuva' channel
'ए लाव रे तो व्हिडीओ' चा आवाज

By

Published : Jun 10, 2020, 4:49 PM IST

'झी युवा' वाहिनीवरील, 'लाव रे तो व्हिडिओ' हा नवा कोरा टॅलेंट शो, तुमचे आगळे कौशल्य जगासमोर आणण्यासाठी तुम्हाला मदत करेल. तुमच्यातील खास टॅलेंटचा २ ते ३ मिनिटांचा व्हिडिओ तुम्ही वाहिनीला पाठवायचा आहे. अर्थात, हा व्हिडिओ आणि तुमचं टॅलेंट हा एक अतरंगी आयटम असायला हवा. तुमचं टॅलेंट जर मनोरंजन करण्यात यशस्वी होणार असेल, तर 'झी युवा'च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र म्हणेल, 'लाव रे तो व्हिडिओ'!!!

हा कोरा करकरीत शो, मनोरंजनाच्या सर्व सीमा पार करेल. कॉमेडी, डान्स, मिमिक्री अशा अनेक टॅलेंटचा या कार्यक्रमात समावेश असेल. सर्वांचीच हसून हसून पुरेवाट होईल. कधी हास्याची लकेर तर कधी फुल्ल ऑन एंटरटेन्मेंटचा कल्ला पाहायला मिळेल. 'लाव रे तो विडिओ' म्हणत, 'झी युवा' हा मजेदार कार्यक्रम सगळ्यांसाठी घेऊन येत आहे. सोशल डिस्टसिंग पाळून, अख्ख्या महाराष्ट्राला महाराष्ट्राचे मनोरंजन करण्यासाठी 'झी युवा' वाहिनी सज्ज आहे. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक, हे आणखी एक मोठे सरप्राइझ असणार आहे. तेव्हा, आपण सुद्धा आता सज्ज व्हायला हवं कारण आपल्याला ही वारंवार म्हणायचंय, ए 'लाव रे तो व्हिडिओ'!!!!

ABOUT THE AUTHOR

...view details