महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सोनी मराठीवर आता आठवड्याचे सातही दिवस अखंड मनोरंजन! - सोनी मराठीवरील मालिकांमध्ये रंजक कथा

प्रेक्षक त्यांच्या लाडक्या मालिकांना वीकेंडला मिस करीत असतात. हे लक्षात घेऊन सोनी मराठीने त्यावर तोडगा काढला. आता या लोकप्रिय वाहिनीच्या लोकप्रिय मालिका, सातही दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

सोनी मराठीवर आता दररोज मालिका
सोनी मराठीवर आता दररोज मालिका

By

Published : Sep 8, 2021, 7:18 PM IST

सोनी मराठीच्या प्रेक्षकांसाठी यंदाचा गणेशोत्सव, बाप्पांच्या आगमनाबरोबरच 'एक्स्ट्रा' मनोरंजनाचा उत्सव ठरणार आहे. येत्या रविवारपासून, पाच सप्टेंबरपासून सातही दिवस मनोरंजनाचा उत्सव साजरा होणार आहे. 'गाथा नवनाथांची', 'तू सौभाग्यवती हो' आणि 'वैदेही' या तिन्ही लोकप्रिय मालिका आठवड्यातले सातही दिवस, सोमवार ते रविवार, प्रेक्षकांच्या भेटीला येतील. खानदानी श्रीमंत कुटुंबाची सून झालेली, पण वयानी अल्लड, खट्याळ असणार्‍या ऐश्वर्याच्या निरागस संसाराची गोष्ट ‘तू सौभाग्यवती हो’ ही मालिका रंगतदार वळणावर असून आपल्या नवर्‍यानी एकदातरी प्रेम व्यक्त करावं, ही ऐश्वर्याची आणि प्रेक्षकांची इच्छा देव पूर्ण करेल का, हा उत्सुकतेचा मुद्दा आहे.

दिव्य शाबरी मंत्र सर्वशक्तीने सिद्ध होण्याचा भव्यपट 'गाथा नवनाथांची' या मालिकेत सुरू असून मच्छिंद्रनाथांचं वेताळाबरोबर होणारं युद्ध प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं आहे. भव्य ग्राफिक्स, आध्यात्मिक कथानकाची नेमकी, अभ्यासपूर्ण मांडणी आणि कलावंतांचा अप्रतिम अभिनय यांमुळे 'गाथा नवनाथांची' अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

सीतेसारखी जन्मपत्रिका असलेल्या वैदेहीच्या आयुष्यात रामाबरोबरच रावणाचाही प्रवेश झाल्याचे संकेत प्रेक्षकांना मिळाले आहेत. वैदेहीचं आयुष्य आता नक्की कोणतं वळण घेणार, नियतीचा काय संकेत असेल, अशी अनपेक्षित वळणं असलेल्या वैदेहीच्या आयुष्यात प्रेक्षक अल्पावधीतच गुंतून गेले आहेत.

या तिन्ही मालिकांमधला हा रंजक कथाभाग आता सात दिवस सलग प्रेक्षकांना अनुभवता येईल. यंदाच्या गणेशोत्सवात दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू होणारा सोनी मराठीवर साजरा होणारा मनोरंजनाचा हा महासोहळा रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

हेही वाचा - सलमान खानला दिलासा, 'सेलमन भोई' गेम हटवण्याचा कोर्टाने दिला आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details