महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

स्वप्नील, अमृता, मधुरा आणि सिद्धार्थ यांची लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ होतेय पुनःप्रसारित - जिवलगा मालिका

स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, मधुरा देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर यांची ‘जिवलगा’ मालिका पुनःप्रक्षेपित करणार आहेत. २ मे पासून दर रविवारी सायंकाळी ६ वाजता ही मालिका स्टार प्रवाह वर पाहता येईल.

‘जिवलगा’ होतेय पुनःप्रसारित
‘जिवलगा’ होतेय पुनःप्रसारित

By

Published : Apr 30, 2021, 11:21 AM IST

मुंबई- स्वप्नील जोशी,अमृता खानविलकर, मधुरा देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या अप्रतिम अभिनयामुळे ‘जिवलगा’ मालिका प्रेक्षक-प्रिय झाली होती. आता या चौकडीचे प्रेमाचे रंग पुन्हा एकदा बहरणार आहेत. कारण ‘जिवलगा’ ही मालिका स्टार प्रवाह पुनःप्रक्षेपित करणार आहे. लोकाग्रहास्तव हे मराठीतील आघाडीचे प्रसिद्ध स्टार्स ‘जिवलगा’ मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

नुकतीच केले दोन वर्ष पूर्ण

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. नुकतीच या मालिकेने दोन वर्षदेखील पूर्ण केली. यानिमित्ताने मालिकेतील कलाकारांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. या व्हिडिओला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. शिवाय पुन्हा एकदा ही मालिका पहायला मिळावी, अशा कमेण्ट्सही येत होत्या. त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘जिवलगा’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे यांच्या दमदार अभिनयाने नटलेली ही मालिका पुन्हा पाहता यावी, अशी मागणी प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होते.

२ मेपासून पुनःप्रसारित

जिवलगा मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलंय. मालिकेचं शीर्षकगीत आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहे. त्यामुळेच ‘जिवलगा’ मालिकेच्या या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत. २ मे पासून दर रविवारी सायंकाळी ६ वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर पाहता येईल.

हेही वाचा -अभिनेता अल्लू अर्जुनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details