महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'द नाईट मॅनेजर' मालिकेतून ह्रतिक रोशनची माघार

अभिनेता ह्रतिक रोशन 'द नाईट मॅनेजर' या गाजलेल्या चित्रमालिकेत मुख्य भूमिका साकारण्यापासून मागे हटला आहे. 'द नाईट मॅनेजर'च्या भारतीय रुपांतरात तो मूळ चित्रपटात अभिनेता टॉम हिडलस्टोनने साकारलेली जोनाथन पाइनची व्यक्तिरेखा ह्रतिक साकारणार होता.

Hrithik Roshan
ह्रतिक रोशनची माघार

By

Published : Feb 23, 2021, 1:25 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनने लोकप्रिय मालिका 'द नाईट मॅनेजर'च्या हिंदी रुपांतरीत मालिकेतून माघार घेतली आहे. हृतिकचा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा टीम एप्रिलमध्ये याचे शूटिंग करण्यासाठी तयार होती.

लेखक जॉन ले कॅरे यांच्या १९९३ मध्ये गाजलेल्या कादंबरीवर आधारित 'द नाईट मॅनेजर' ही मालिका होती. यात अभिनेता टॉम हिडलस्टनने साकारलेली जोनाथन पाइनची व्यक्तिरेखा ह्रतिक साकारणार होता. या भूमिकेसाठी ह्रतिकला ७५ कोटी रुपयांची ऑफर निर्मात्यांनी दिली होती. पण तारखांचा मेळ बसत नसल्यामुळे त्याने या प्रोजेक्टमधून माघार घेतल्याचे वृत्त एका वेब्लॉइडने दिले आहे.

हिडलस्टनने साकारलेल्या निर्भय भूमिकेत हृतिक झळकणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. आता या भूमिकेसाठी निर्मात्याला नव्या तगड्या कलाकाराची शोधाशोध करावी लागले.

बनिजय आशिया निर्मित या मालिकेमध्ये संदीप मोदी असून त्याने गेल्या वर्षी हिट झालेल्या आर्या या वेब सिरीजची सह-निर्मिती आणि सह-दिग्दर्शन केले होते.

हेही वाचा - वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीच्या दिशेने रवाना, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details