धमाल, मौजमजा व मैत्रीवर भाष्य करणारी 'शांतीत क्रांती' ही प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारी सिरीज असेल. ही सिरीज प्रत्येक मैत्रीमध्ये आवश्यक असलेला समजूतदारपणा व उद्देशावर प्रकाश टाकते. ही कथा ३ जिवलग मित्र श्रेयस, दिनार व प्रसन्न यांच्या विलक्षण साहचर्याला दाखवते. हे तिघेही स्वयं-शोधाच्या प्रवासावर जातात, जो नकळतपणे त्यांच्या जीवनाला कायमस्वरूपी कलाटणी देतो. आपण जीवनामध्ये पुढे जात असताना खरे मित्र आपले आधारस्तंभ बनतात, आपल्या अनुभवांमध्ये मोलाची भर करतात, आपले जीवन अविरत आठवणींनी भरून टाकतात.
‘शांतीत क्रांती' चे कथानक श्रेयस, दिनार व प्रसन्न यांच्यामधील अतूट नात्याला सादर करते यांच्या भूमिका अनुक्रमे या सिरीजमध्ये अभय महाजन, आलोक राजवाडे व ललित प्रभाकर यांनी साकारल्या आहेत. कायमस्वरूपी तरूण व काळजी-मुक्त असण्याची इच्छा असलेल्या या तिघांचा हा प्रवास त्यांच्या मैत्रीला आव्हान करतो व यामधून आत्मपरीक्षण व साक्षात्काराच्या प्रवासाला सुरूवात होते. चढ-उतार, ट्विस्ट्स व वळण आणि जीवनाशी संबंधित शिकवण या सिरीजला पाहण्यासाठी सर्वागीण व अविस्मरणीय बनवतात.
ही सिरीज आठवण करून देईल की गंतव्यस्थान नाही तर त्यापर्यंत पोहोचविणारा प्रवास महत्त्वाचा असतो. विनोदी स्वरूपात सिरीज जीवनातील चढ-उतारांचा सामना करण्याच्या पद्धतींना दाखवते. श्रेयस नात्यामधील आव्हानांशी सामना करत असतो, प्रसन्न पूर्ण न झालेल्या स्वप्नांच्या तणावाचा सामना करत असतो आणि दिनार जीवनातील अनपेक्षित गोष्टींचा सामना करत असतो. ही सिरीज हलक्याफुलक्या पद्धतीने या पात्रांच्या पुढे जाणा-या जीवनप्रवासाला सादर करते.
दिग्दर्शक सारंग साठये व पौला मॅकग्लीन म्हणाले, ''कथा, अनुभव, हास्य आणि त्यामधून मिळणारा संदेश या सिरीजला पाहण्यासाठी अत्यंत रोमांचक बनवतात. 'शांतीत क्रांती' ही पडद्यावर सादर करण्यात आलेली प्रत्येकाची कथा आहे. आम्हाला खात्री आहे की, सर्व भौगोलिक क्षेत्रांमधील प्रेक्षक या सिरीजशी संलग्न होतील. आम्ही प्रेक्षकांना 'शांतीत क्रांती'सह आरामात मनोरंजनाचा आनंद घेताना पाहण्यासाठी उत्सुक आहोत.''