राज आणि डिके या दिग्दर्शक जोडीने मनोज बाजपेयी अभिनित ‘द फॅमिली मॅन' दिला होता आणि आता त्याचा दुसरा सिझन तयार असून त्याच्या चित्रझलकीचे अनावरण उद्या होणार आहे. हा दुसरा सिझन अजूनही मोठ्या स्केलवर बनविण्यात आला असून एका नवीन मिशनसह गुप्तहेर श्रीकांत तिवारी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, भव्यदिव्य भाग घेऊन.
नव्या सीजनमध्ये, देशाचा लाडका फॅमिली मॅन उर्फ श्रीकांत तिवारी उर्फ मनोज बाजपेयी, अखेरीस आपल्या बहुप्रतीक्षित ऍक्शन-स्पाय-थ्रिलरसोबत परतत आहे. या वेळी, हा संघर्ष, अधिक तीव्र असणार आहे कारण हा आता केवळ आपले कुटुंब आणि कठीण नोकरीतील आयुष्य यांच्या संतुलनासाठीचा संघर्ष असणार नाहीये तर, त्याला एका नव्या दुष्मनासोबत दोन हात करावे लागणार आहेत. नवी दुश्मन आहे 'राजी' जिची भूमिका साकारतेय सामंथा अक्किनेनी.
या पुरस्कार विजेत्या अमेझॉन ओरिजिनल सीरीजसोबत दाक्षिणात्य फिमेल सुपरस्टार सामंथा अक्किनेनी आपला डिजिटल डेब्यू करत आहे, जी पद्मश्री मनोज बाजपेयी, प्रियामणि यांच्या सोबत दिसणार आहे. या सोबतच, शारिब हाशमी, सीमा विश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकुर सारखे प्रतिभावान कलाकार सुद्धा मालिकेतून दिसणार आहेत. या सिरीजमध्ये तामिळ सिनेमातील प्रसिद्ध व अफलातून कलाकार, माइम गोपी, रवींद्र विजय, देवदर्शिनी चेतन, आनंदसामी आणि एन. अलगमपेरुमल देखील असणार आहेत.