मुंबई - द कपील शर्मा शोच्या पुढील भागात नेहमीप्रमाणे कपील आणि टीम पुन्हा धमाल मजामस्ती करायला सज्ज झाली आहे. या शोचा प्रोमो नुकताच रिलीज झालाय. यात कपील उस्ताद बेगम अली खान या अनोख्या रुपात अवतरलाय. त्याचा लूक पाहून तर हसायला येतेच पण त्याने केलेली भूमिकाही तितकीच मजेशीर आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
Video : कपील शर्माच्या अनोख्या अदाने शोमध्ये उडाला धुराळा - Krushna Abhishek
द कपील शर्मा या शोचा प्रोमो नुकताच रिलीज झालाय. यात कपील उस्ताद बेगम अली खान या अनोख्या रुपात अवतरलाय. त्याचा लूक पाहून तर हसायला येतेच पण त्याने केलेली भूमिकाही तितकीच मजेशीर आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
द कपील शर्मा शोच्या या प्रोमोमध्ये कॉमेडी किंग कपीलसह इतर टीमनेही धमाल केली आहे. बच्चा यादव, भूरी या पात्रांनी धमाल उडवून दिली आहे. सोनी टीव्हीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "देर ना हो जाए, मोहल्ल्यात पुन्हा एकदा उस्ताद मीडियम बेगम अली खान."
कपील शर्मा शोमध्ये असा विनोदाचा धमाका पहिल्यांदा होत नाही. हा शो सतत नव्या विनोदी संकल्पनांना वास्तवात आणत असतो. कपीलचे सहकारी कीकू शारदा, कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, भारती आणि चंदन प्रभाकर या शोमध्ये रंग भरण्याचे काम करीत असतात.