मुंबई - लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे कठिण आहे. अशावेळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दूरदर्शनने एकेकाळी गाजलेल्या मालिकांचे पुन्हा प्रसारण सुरू केले आहे. यात रामायण, महाभारत, सर्कस, शक्तिमान आणि ब्योमकेश बख्शी यासारख्या मालिकांचा समावेश आहे. यात आता नवीन भर डली असून जंगल बुक ही गाजलेली मालिका ८ एप्रिलपासून दुपारी १ वाजता दाखवली जाणार आहे.
दूरदर्शनने मोठ्यांसह छोट्या बच्चे कंपनीचा विचार करुन जंगल बुक प्रसारित करण्याचा निर्णय घेतलाय. याची घोषणा दूरदर्शनच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलीय.