मुंबई - ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील मल्हार आणि अंतरा यांच्यात एकीकडे पराकोटीचा द्वेष आणि दुसरीकडे लग्नासारखे पवित्र बंधन यामध्ये दोघांचीही कसोटी लागत आहे. परस्परविरोधी स्वभावाच्या मल्हार आणि अंतरा यांच्या लग्नानंतर नात्यांचा गुंता अधिकच वाढला. दोघांचेही आयुष्य खूपच बदलले, किंबहुना लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. आता मालिकेत अंतराचा ‘हटके’ आणि ‘हॉट’ अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
जीव माझा गुंतला मालिकेत येणार्या वेगवेगळ्या घटनांमुळे मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. अंतरा आणि मल्हारची केमेस्ट्री, त्यांच्यातील नोक झोक कधी त्यांच्यातील अबोला, तर कधी त्यांच्यातील भांडण लोकांना आवडत आहे. खानविलकरांच्या घरी येणार्या विशेष पाहुण्यांसाठी मल्हारने अंतराला टास्कच दिला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते नाही जमलं तर आईच्या घरी असे देखील तो म्हणाला. त्यामुळे आता अंतरा आता पदर खोचून तयारीला लागली आहे.