रुपाली भोसले, मधुराणी गोखले प्रभुलकर, हर्षदा खानविलकर, गिरीजा प्रभू, समृद्धी केळकर, माधवी निमकर या प्रसिद्ध अभिनेत्री स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकांमधून संजना, अरुंधती, सौंदर्या, गौरी, कीर्ती आणि शालिनीच्या भूमिकांत प्रेक्षकांचे मनोरंजन करताहेत. गणेशोत्सव जवळ आलाय आणि आता या सर्व स्टार प्रवाहच्या नायिका अनोखा अंदाजात गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहेत. त्यांच्या हटके लूकची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.
स्टार प्रवाहवर १२ सप्टेंबरला दाखवल्या जाणाऱ्या ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या गणपती विशेष कार्यक्रमाच्या प्रोमोजनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार असल्यामुळे गणेशोत्सवाची रंगत द्विगुणीत होणार यात शंका नाही. या विशेष कार्यक्रमात स्टार प्रवाहच्या नायिकांचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.
स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा डबल धमाका असणार आहे. ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे. सणासुदीचे दिवस म्हण्टले तर आपले पारंपरिक खेळही ओघाने आलेच. स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या तुमच्या आवडीच्या सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखिल खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाने परिपूर्ण असा हा गणपती विशेष कार्यक्रम असेल.