मराठीतील हजारो सर्वोत्तम पुस्तके कुठेही कधीही ऐकण्याचे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी आपल्याला स्टोरीटेलने उपलब्ध करून दिले आहे. स्टोरीटेल इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, गुजराती आणि कन्नड या ११ भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक आणि ईबुक्स प्रकाशित करते. आता ते घेऊन आले आहेत जगविख्यात ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांची कादंबरी, 'गिनीज बुक रेकॉर्ड्स' विजेती, 'द अल्केमिस्ट'.
मूळतः पोर्तुगीज भाषेत लिहिली गेलेली, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गाजलेली आणि 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये उच्चांकी खपासाठी नोंद झालेली ही एक रसाळ कादंबरी 'स्टोरीटेल मराठी'ने आपल्या साहित्यप्रेमींसाठी खास 'फ्रीडम मंथ' निमित्ताने उपलब्ध केली आहे. 'द अलकेमिस्ट' (पोर्तुगीज: O Alquimista) शब्दांचे किमयागार म्हणून जगविख्यात झालेले ब्राझिलियन लेखक पाउलो कोएल्हो यांची सर्वाधिक वाचक लाभलेली ही कादंबरी आहे, जी प्रथम १९८८ मध्ये प्रकाशित झाली होती.
विविध देशांतील पंचावन्न पेक्षा अधिक भाषांमध्ये 'द अल्केमिस्ट' कादंबरी अनुवादित झाली आहे. मूळतः पोर्तुगीज भाषेत लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचे अत्यंत लोभस मराठी रूपांतर लेखिका डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके यांनी केले आहे. ‘द अल्केमिस्ट’ ही वैश्विक पातळीवर प्रचंड गाजलेली बहुचर्चित कादंबरी असून ती साहित्यरसिकांना केवळ भावनावश किंवा अंतर्मुख करण्यापुरतीच मर्यादित नसून 'स्टोरीटेल मराठी ऑडिओबुक' ऐकताना अद्भुत आणि विलक्षण अनुभव देते.