मुंबई - अभिनेता मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत 'द फॅमिली मॅन'- सीझन २' मध्ये पुनरागमन करण्यास तयार आहे. चित्रपट निर्माते जोडी राज आणि डीके यांनी तयार केलेल्या, दिग्दर्शित आणि निर्मित शोचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
66-सेकंदाच्या लांबीच्या व्हिडिओमध्ये एक रोमांचक, ग्रिपिंग आणि अॅक्शन पाहायला मिळत आहे.
फॅमिली मॅन सीझन 2 मध्ये दक्षिण भारतीय स्टार अभिनेत्री सामन्था अक्केनेनी हिने डिजिटल पदार्पण केले आहे. या वेब सिरीजमध्ये मनोज बाजपेयी, प्रियामणि, शरिब हाश्मी, दर्शन कुमार, शरद केळकर आणि श्रेया धनवंतरी या कलाकारांसोबत सामन्था महत्त्वाच्या भूमिकेत आहे. टीझरमध्ये शोमधील तिच्या भूमिकेबद्दल फारसे काही सांगण्यात आलेले नाही.