महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'द फॅमिली मॅन 2'वर बंदी घालण्याची सीमन यांची मागणी

तमिळ लोकांना चुकीच्या पद्धतीने चित्रित करणारे इनाम आणि मद्रास कॅफे सारख्या चित्रपटांना थिएटरमध्ये प्रदर्शनापासून परावृत्त केले होते. त्यामुळे द फॅमिली मॅन २ या वेब सिरीजवरही बंदी घालण्यात यावी अशी मागणी सीमन यांनी केली आहे.

the-family-man-2-lands-into-troubl
'द फॅमिली मॅन 2'वर बंदी

By

Published : May 21, 2021, 10:03 PM IST

चेन्नई- नाम तमिलार कट्ची (एनटीके)चे संस्थापक सीमन यांनी शुक्रवारी अमेझॉन प्राइम वेब सीरिज 'द फॅमिली मॅन 2' बंद घालण्याची मागणी केली आहे. यामध्ये तमिळ लोक हे लबाड असतातआणि लिबरेशन टायगर्स फॉर तमिळ इलम (एलटीटीई) दहशतवादी असल्याचे चित्रण मालिकेत करण्यात आले आहे. सीमन यांनी येथे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की द फॅमिली मॅन 2 या वेब मालिकेचा ट्रेलर धक्कादायक आहे.

सीएम म्हणाले, "मालिका एलटीटीईला जाणीवपूर्वक दहशतवादी आणि तमिळ लोकांना लबाड म्हणून दर्शविण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी चेन्नई लोकेशन म्हणून निवडण्यात आले हा काही योगायोग नाही," असे सीमन म्हणाले.

''त्यांच्या मते, वेब सीरिजची कथा श्रीलंकेतील इलमच्या आसपास फिरते ज्यात अतिरेकी म्हणून साकारलेली स्त्री आहे. तिच्या ड्रेसचा रंग एलटीटीईच्या गणवेशासारखाच आहे आणि त्यात अतिरेकी गट आणि पाकिस्तानी आयएसआय यांच्यातील संबंधांबद्दलचे संवाद आहेत," सीमन पुढे म्हणाले.

“इलममधील २ लाख तामिळ लोकांच्यावर सिंहलींनी जुलमाने अत्याचार केला, अशा तर्‍हेने लोकशाही मानणाऱ्या तमिळ लोकांना अतिरेकी लोक म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये नैतिक व कायदेशीर संघर्षातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ", सीमन पुढे म्हणाले.

तमिळ लोकांना दिशाभूल करण्यासाठी तयार झालेल्या 'द फॅमिली मॅन 2' या मालिकेचा ट्रेलर रिलीज होताच जगभरातील तमिळ लोक मोठ्या प्रमाणावर संतापले असून याची निंदा नोंदवत आहेत.

वेब सीरिजवर बंदी घालण्याचे आवाहन करीत सीमन म्हणाले, की यापूर्वीही व्यापक विरोधामुळे तमिळ लोकांना चुकीच्या पद्धतीने चित्रित करणाऱ्या इनाम आणि मद्रास कॅफेसारख्या चित्रपटांना थिएटरमध्ये प्रदर्शनापासून परावृत्त केले होते.

तामिळनाडूमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एनटीके मतांच्या बाबतीत तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे. पक्षाला सुमारे सात टक्के मतांचा वाटा मिळाला होता.

हेही वाचा - अभिनव शुक्लाच्या जवळ जाण्याची भीतीने राखी सावंतची 'खतरों के खिलाडी ११' मधून माघार

ABOUT THE AUTHOR

...view details