मुंबई - द फॅमिली मॅन बेव सिरीजची प्रतीक्षा वाढली आहे. पहिल्या सिझनला मिळालेल्या उत्सफुर्त प्रतिसादामुळे नव्या भागात काय घडणार याची उत्सुकता वाढली आहे. या मालिकेचा ट्रेलर १९ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र तो रिलीज न झाल्यामुळे चाहते अस्वस्थ आहेत. अशातच मनोज बाजपेयींनी दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे प्रेक्षक आश्वस्त झाले आहेत.
फॅमिली मॅनचा दुसरा भाग कधीही न विसरणारा अनुभव असेल असे मत बाजपेयी यांनी व्यक्त केलंय. यामध्ये मनोज बाजपेयी एनआयए एजेंट श्रीकांत तिवारी ही व्यक्तीरेखा पुन्हा साकारत आहे.
मनोज बाजपेयी म्हणाला, ''काही वेळाच मी माझ्या कामाबद्दल मत व्यक्त करतो. मी फक्त एवढेच म्हणेन की पहिल्यापेक्षा अधिक उत्तम आणि वेगळे होणार आहे.''