बिग बॉस ओटीटीचा तिसरा आठवडा सुरु झाला असून बिग बॉस ओटीटी घरामध्ये रोज एक नवीन दिवस येतो आणि नात्यांमध्ये रोज एक नवीन प्रारंभ होते. या घरातील सदस्यांना चॅलेंजेस्, ट्विस्ट्स व टर्न्स देण्यात आले आहेत. या आठवड्यात घरातील कनेक्शन्सना त्यांचे कनेक्शन्स बदलून नवीन कनेक्शन सुरू करण्याची संधी देण्यात आली. शमिता-राकेश, निशांत-मूस आणि दिव्या-झीशान यांनी त्यांचे कनेक्शन कायम ठेवले, पण प्रतीक, अक्षरा, नेहा व मिलिंद यांच्यामधील समीकरणे बदलली आणि मोठा ड्रामा घडला. नेहा भसिनने सांगितले की मिलिंद गाबासोबत असताना इतर सदस्य तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून तिच्याकडे बघतात जे तिला आवडत नाही आणि म्हणून तिने आरोप करत त्याचा पाणउतारा केला.
हे टास्क योग्यरित्या झाले का नाही हे बिग बॉस ठरवितो. बिग बॉस ओटीटीच्या घरामध्ये नाट्य, हृदयभंग व वादविवाद होतच असतात आणि सदस्यांनी केलेले टास्क काही वेगळे नव्हते. बिग बॉसचा गेम ऑफ हार्ट्स चा टास्क प्रतीक व अक्षरासाठी चांगला ठरला नाही. प्रथम प्रतीकने मनापासून तिचा स्वीकार केला आणि त्यानंतर दोनदा तिचा हृदयभंग केला. नेहाला प्रतीक, तर अक्षराला मिलिंद आवडू लागला आणि दोन प्रबळ दावेदार महिलांमध्ये मोठा वादविवाद झाला.
प्रतीक यामागील कारण सांगत म्हणाला, ''अक्षरा आणि गाबा यांच्यामध्ये उत्तम कनेक्शन आहे, ज्यामुळे त्यांनी एकत्र आले पाहिजे.'' याबाबत प्रत्युत्तर देत अक्षरा पटकन म्हणाली, ''मला कोण आवडू लागला आहे, हे दुसरे कोणी ठरवू शकत नाही.'' त्यानंतर नेहाला प्रतीक आवडू लागल्याचे समजल्यावर मिलिंदने रागाने प्रत्युत्तर दिले की, ''मला धक्काच बसला आहे. इतक्या लवकर तर अंडे देखील शिजवून पलटता येत नाही जितक्या लवकर तुम्ही पलटला आहात.''