महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

भिन्न प्रवृत्तीच्या कुटुंबांतील भांडणांना विनोदाची फोडणी देणारी मालिका 'और भाई क्‍या चल रहा है?' - और भाई क्‍या चल रहा है विनोदी मालिका न्यूज

अँड टीव्हीवर और भाई क्‍या चल रहा है ही विनोदी मालिका सुरू होणार आहे

Aur Bhai Kya Chal Raha hain
और भाई क्‍या चल रहा है

By

Published : Mar 21, 2021, 12:09 PM IST

मुंबई - दोन मित्र किंवा ओळखीचे भेटले की सहज एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे, ‘कसं काय चालू आहे?’ हिंदी भाषिक तोच प्रश्न ‘और भाई क्‍या चल रहा है?’ असा विचारतात. 'और भाई क्‍या चल रहा है?’ टायटल घेऊन एक विनोदी मालिका 'अँड टीव्ही' या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लखनऊच्या पार्श्‍वभूमीवर आधारित ही मालिका परिस्थितीजन्य कॉमेडीची (सिच्युएशनल कॉमेडी) झलक दाखवणार आहे.

विनोदी मालिकांची साखळी पुढे नेत, लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर है' असो किंवा मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'ची घरेलू कॉमेडी असो किंवा जीवनाचे सार दाखवणारी मालिका 'गुडिया हमारी सभी पे भारी' असो सतत हलके-फुलके कन्‍टेन्‍ट सादर करून 'अँड टीव्ही'ला भरघोस यश मिळाले आहे. त्यामुळे आता हिच वाहिनी आता 'और भाई क्‍या चल रहा है' ही नवीन मालिका घेऊन येत आहे. यात स्‍थानिक विनोदाची आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

दोन विभिन्‍न संस्‍कृती असलेल्‍या कुटुंबांना एकाच छताखाली राहण्‍यास सांगण्‍यात येते तेव्‍हा निश्चितच वाद होणार. मालिकेतील ही दोन्‍ही कुटुंबे एका जुन्‍या नवाबी हवेलीमध्‍ये राहतात. ही हवेली स्‍वत:च्‍या मालकीची करण्‍याची आणि दुस-यासोबत शेअर न करण्‍याची दोन्ही कुटुंबांची इच्‍छा आहे. लहान शहरातील राहणीमान आणि दोन्ही घरातील स्त्री वर्गाच्या भिन्न अपेक्षा यातून खटके तर उडतात. तरीही दोन्ही, मिश्रा व मिर्झा कुटुंबं दीर्घकाळापासून चालत आलेल्या लखनऊच्या गंगा-जमुनी ‘तहजीब’ला धक्का लागू देत नाहीत. मालिकेत दैनंदिन समस्‍या व घटनांच्‍या अवतीभोवती गुंफलेली भांडणं व कलह याला मनोरंजनाचा मुलामा दिला गेला आहे.

अमजद हुसैन शेख (शेड प्रॉडक्‍शन्‍स) निर्मित 'और भाई क्‍या चल रहा है?' ही मालिका ३० मार्च २०२१ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता अँड टीव्‍हीवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा -स्वप्निल जोशीच्या ‘बळी’ने वाढवली उत्सुकता

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details