मुंबई- अभिनेता सोनू सूदच्या कार्यावर आधारित पुस्तक प्रकाशित होत आहे. 'आय एम नॉट मसिहा' असे या पुस्तकाचे नाव आहे. जर्नालिस्ट मीना के अय्यर यांनी लिहिलेले हे पुस्तक पेंग्विन या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित होणार आहे.
भारतात जेव्हा कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली तेव्हा देशभर पसरलेल्या प्रवासी मजूरांसाठी संकटाचा काळ सुरू झाला. या मजूरांना आपल्या घरी परतायचे होते. मात्र रेल्वे सेवा बंद, वाहतूक बंद असल्यामुळे बससेवाही बंद झाल्या. मजूरांचे हाल सुरू झाले. पुरेसे अन्न नाही, राहायला जागा नाही, मुलाबाळांचा उपवास सुरू झाला. अशावेळी सोनू सूद देवदूत बनू मजूरांच्या मदतीला धावला. त्याने हजोरो मजूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी देशभर एक जाळे विणले. प्रवासी मजूर आपल्या घरी परतले आणि देशभरातून सोनू सूदला मसिहा म्हणून ओळखले जाऊ लागले. याच विषयाला वाहिलेले हे पुस्तक आता वाचकांच्या हाती येत आहे.