मुंबई - कार्टून चित्रपट 'द अँग्री बर्ड मूवी 2' चा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. इंग्रजी भाषेतील ट्रेलर रिलीज झाला असून हिंदी डब असलेल्या यातील रेड या कार्टून व्यक्तीरेखेला कॉमेडियन कपील शर्माने आपला आवाज दिलाय. इतकेच नाही तर कपीलच्या टीममधील किकू शारदा आणि अर्चना पुरण सिंग यांनीही चित्रपटाचे डबिंग केले आहे.
'द अँग्री बर्ड'च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी प्रचंड उचलून धरले होते. बॉक्स ऑफिसवरही खूप कमाई सिनेमाने केली होती. मुलांसोबत मोठ्यांनाही सिनेमाने वेड लावले होते. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हा ट्रेलर शेअर केला आहे.