बरेली - बरेली येथील रहिवासी टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री तृप्ती शंखधर हिने आपल्या वडिलांपासून आपल्या जीवला धोका असल्याचा दावा केला आहे. 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीने याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की,आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी ती पळून गेली आहे. त्यामुळे तिचे वडिल चिडले असून ते रागापायी कोणत्याही थराला जाऊ शकतात.
तृप्ती हिने बरेली पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली आहे. इतकेच नाही तर तिच्या वडिलांवरही मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. मुंबईला करियर करण्यासाठी जाताना दिलेले पैसेही वडिल परत मागत असल्याचे तिने म्हटलंय.
तृप्तीने हा व्हिडिओ मंगळवारी रात्री तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. १९ वर्षांची तृप्ती आपल्या आईसह घराबाहेर पडली आहे.