पुणे- आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दिनांक २ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सव मुकुंदनगर येथील कटारिया शाळेच्या प्रांगणात पार पडेल.
नियमांचं पालन करून महोत्सवाचे आयोजन
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली.
हेही वाचा -Miss Universe 2021 : भारताच्या हरनाझ संधूने कोरलं ‘मिस युनिव्हर्स 2021’वर नाव, जाणून घ्या तिच्याविषयी...