मुंबई -भारतीय चित्रपटाच्या इतिहासात ‘शोले’ या चित्रपटाचे नाव सुवर्णाक्षरात लिहून ठेवले जाईल. त्या चित्रपटातील प्रमुख पात्रांबरोबरच छोटी छोटी पात्रेही खूप फेमस झाली. प्रमुख पात्रांमध्ये जय (अमिताभ बच्चन), वीरू (धर्मेंद्र), ठाकूर (संजीव कुमार), बसंती (हेमा मालिनी), राधा (जया बच्चन) ही पात्रे तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. यातील प्रसिध्द पात्र म्हणजे गब्बर सिंग. गब्बर सिंग सारखा व्हिलन हिंदी चित्रपटामध्ये पुन्हा होणे नाही असे बोलले जाते. या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन उत्सुक होता. परंतु दिग्दर्शकाने लेखक सलीम नवख्या अमजद खानला संधी दिली होती. परंतु त्या भूमिकेसाठी त्याकाळी खलनायकी कलाकारांना ती ऑफर झाली होती. ज्यात ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा हेही होते. परंतु, त्यावेळी त्यांनी गब्बर सिंग ची भूमिका नाकारली होती. का ते त्यांनी इंडियन आयडॉल च्या मंचावरून सांगितले.
.म्हणून मी नाकारला होता ‘शोले’ : शत्रुघ्न सिन्हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सिझन १२ मध्ये या वीकएंडला बॉलीवूड स्टार शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम सिन्हा हे या मंचाला भेट देणार आहेत. आणि त्यामुळेच आगामी भाग हा ‘शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा’ विशेष भाग असणार आहे. सर्व स्पर्धक हिमेश रेशमिया, सोनू कक्कड आणि अन्नू मलिक या परीक्षकांसमोर खुद्ध शत्रुघ्न सिन्हाच्या उपस्थितीत त्यांची गाजलेली गाणी सादर करताना दिसतील. मनमोकळ्या गप्पा-गोष्टींच्या ओघात, परीक्षक हिमेश रेशमिया या बॉलीवूड स्टारच्या प्रवासातील काही मजेदार किस्से उघड करताना दिसेल. ‘शोले’ चित्रपट न स्वीकारण्यामागचे खरे कारण काय होते या हिमेशच्या प्रश्नाला उत्तर देताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाला, “त्या काळात मी अशा काही चित्रपटांच्या शूटिंगमध्ये गुंतलेला होतो, ज्यात दोन नायक होते. कसे कोण जाणे, तुम्ही याला मानवी चूक म्हणा किंवा कदाचित माझ्या तारखांची समस्या असेल, पण मी शोले स्वीकारला नाही खरा. मला त्याचे वाईट वाटते आणि त्याच वेळी बरेही वाटते कारण शोले मुळेच माझा प्रिय मित्र, राष्ट्रीय आयकॉन अमिताभ बच्चन याला मोठा ब्रेक मिळाला.” ‘शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा’ आपली चूक मान्य करत ते म्हणाले, “याला तुम्ही ‘मानवी चूक’ म्हणू शकता. रमेश सिप्पी साहेब भव्य चित्रपट बनवत असत आणि त्यांनी शोले बनवला तेव्हा तो खूपच गाजला आणि जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, भारतरत्न व ऑस्कर विजेता स्व. सत्यजीत रे यांनी देखील यांना देखील हा चित्रपट आवडला आणि त्यांनी ‘शोले’चे कौतुक केले होते.”शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, “बर्याचदा तारखांच्या समस्येमुळे चित्रपट नाकारावा लागतो. अमिताभ बच्चनला कालीचरण करायचा होता, पण त्याला काही कारणाने नाही जमले. या गोष्टी स्वाभाविक आहेत. अगदी राजेश खन्ना, शाहरुख खान, सलमान खान, सनी देओल यांनीही या ना त्या कारणाने काही चित्रपट नाकारले असतील. याला इलाज नाही.” इंडियन आयडॉल सिझन १२, हा संगीत रियालिटी शो, प्रसारित होतो प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रात्री ९.३० वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.