विठाई प्रतिष्ठानच्या अभिजित चव्हाण यांच्याद्वारे दरवर्षी होळीच आयोजन करण्यात येतं. दरवर्षी या शाळेतली मूल आवर्जून या दिवसाची वाट पाहतात. सगळ्यात आधी होलिकामातेला वंदन करून होळीला ओवाळून होळी पेटवली जाते. त्यानंतर डीजे आणि गाण्याच्या तालावर मनसोक्तपणे रंग खेळले जातात.
ठाणेकर कलाकारांनी 'जिद्द' शाळेतील विशेष मुलांसोबत साजरी केली होळी - marathi celebs with special kids
ठाण्यातील मराठी कलाकार दरवर्षी आपली होळी 'जिद्द' या संस्थेतील विशेष मुलांसोबत साजरी करतात. या निमित्ताने एकमेकांसोबत आनंद वाटून होळीचा सण साजरा करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो. यंदा या उपक्रमाला 14 वर्ष पूर्ण झालीत.
मुलांसोबत साजरी केली होळी
दिग्दर्शक विजू माने, अभिजित पानसे, नयन जाधव, रवी जाधव हे दरवर्षी कितीही बिझी असले तरीही या दिवशी वेळात वेळ काढून आवर्जून इथे रंगपंचमी साजरी करायला येतात. या मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव आणि आनंद पाहून वर्षभर नवीन काही करून दाखवण्याची सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितलं. तर या होळीची ख्याती ऐकून काही सेलिब्रिटी आवर्जून या होळीसाठी येतात. यंदा अभिनेत्री नेहा शितोळे ही या होळीत सहभागी होण्यासाठी अली होती.