‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेली १३ वर्षे प्रेक्षकांना आपल्या निखळ विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. एका तपापासून हास्य, प्रेम आणि मनोरंजनाचा प्रसार करीत हा शो आज निःसंशयपणे देशाचा सर्वाधिक आवडता फॅमिली शो झाला आहे. हा भारतातील एकमात्र फॅमिली टीव्ही शो आहे जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन करीत आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा २८ जुलाई, २००८ रोजी प्रथमच सब टीव्ही, सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियावर प्रसारित झाला. नीला फिल्म प्रॉडक्शन्स प्राइवेट लिमिटेड प्रस्तुत भारताचा सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) ने अलिकडेच ३२०० ‘हॅपीसोड्स’ पूर्ण केले. या शो मधील गोकुळधाम सोसायटी आज इतकी प्रसिद्ध झाली आहे कि ती 'मिनी इंडिया' म्हणून ओळखली जाते. तारक मेहता का उल्टा चष्मा असित कुमार मोदी द्वारा लिखित आणि निर्मित आहे. हा कार्यक्रम मराठीत गोकुळधामची दुनियादारी आणि तेलुगू भाषेत तारक मामा अय्यो रामा म्हणून युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.