तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता ही अडचणीत सापडली आहे. तिने रविवारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यात तिने जातीवाचक आणि अपमानजनक शब्दांचा वापर केल्यामुळे तिच्या विरुध्द हरियाणा राज्यातील हांसीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मला यूट्यबवर यायचे आहे त्यामुळे मला चांगले दिसायचे आहे..***सारखे नाही, असे म्हणताना तिने जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि तिच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली.
नॅशनल अलायन्स फॉर दलित ह्यूमन राईट्सचे संयोजक रजत कालसन यांनी अभिनेत्री मुनमुन दत्तावर एट्रोसिटी कायद्या्ंतर्गत तक्रार दाखल केली आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. त्यामुळे तिला अटक झाल्यास न्यायालय जामीन नाकारु शकते. त्यामुळे मुनमुनला तुरुंगातची हवा खावी लागू शकते.