महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राजकीय 'तांडव' करण्यासाठी सैफ अली सज्ज, भव्य वेब सिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला - 'तांडव' या वेब सिरीजचा ट्रेलर

अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शन केलेल्या 'तांडव' या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सैफ अली खान, डिंपल कपाडिया यांच्यासह दिग्गज कलावंत यात भूमिका साकारत आहेत. अमेझॉन प्राईमवर ही मालिका १५ जानेवारीला स्ट्रिमिंग होणार आहे.

ali abbas zafar tandav trailer
'तांडव' या वेब सिरीजचा ट्रेलर

By

Published : Jan 4, 2021, 7:55 PM IST

मुंबई - राजकारणावर आधारित अनेक टीव्ही मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजही आल्या. परंतु भव्यतेच्या बाबतीत नुकताच रिलीज झालेला तांडव या वेब सिरीजचा ट्रेलर सर्व बाबतीत उजवा ठरतो. सैफ अली खानची तडाखेबंद भूमिका असलेली ही वेब सिरीज १५ जानेवारीला प्राईम व्हिडिओवर रिलीज होत आहे. याचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.

या वेब सिरीजमध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. यामध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, झीशान अयूब, सुनील ग्रोवर, कृतिका कामरा, कुमुद मिश्रा, सारा जेन डायस, दिनो मोरिया, गौहर खान, संध्या मृदुल, अनुप सोनी, परेश पाहुजा, शोनाली नागराणी, हितेन तेजवानी, अमिरा दस्तुर, नेहा हिंगे, सुखमणी सदना आणि इतरांच्या मुख्य भूमिका आहेत.

अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शन केलेली ही वेब सिरीज हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी निर्माण केली आहे. अमेझॉन प्राईमवर ही मालिका १५ जानेवारीला स्ट्रिमिंग होणार आहे.

हेही वाचा -सुश्मिता सेनने प्रियकर रोहमन शावलला दिल्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details