टॅलेंटेड गायत्री दातार ‘प्लॅनेट टॅलेंट’च्या यादीत झाली समाविष्ट! - गायत्री दातार ‘प्लॅनेट टॅलेंट’च्या यादीत
‘प्लॅनेट मराठी’चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या ‘प्लॅनेट टॅलेंट (प्लॅनेट टी) बरोबर आजवर अनेक नामवंत चेहरे जोडले गेले आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर, सायली संजीव, शिवानी बावकर, अभिनेता निखिल चव्हाण यांच्यासह दिग्दर्शक संजय जाधव ही प्लॅनेटशी जोडले गेले आहेत. तर महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधवही नुकताच ‘प्लॅनेट टॅलेंट’बरोबर जोडला गेला आहे. आता अभिनेत्री गायत्री दातार हे नावही ‘प्लॅनेट टॅलेंट’शी जोडलं जाऊन येत्या काळात दिमाखात झळकणार यात शंका नाही.
![टॅलेंटेड गायत्री दातार ‘प्लॅनेट टॅलेंट’च्या यादीत झाली समाविष्ट! गायत्री दातार ‘प्लॅनेट टॅलेंट’च्या यादीत झाली समाविष्ट!](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10332490-566-10332490-1611282246774.jpg)
मुंबई - चित्रपट निर्मिती असो, वा आगामी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’... ‘प्लॅनेट मराठी’ हे नाव या ना त्या कारणांनी सध्या मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय बनले आहे. ‘प्लॅनेट मराठी’चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या ‘प्लॅनेट टॅलेंट (प्लॅनेट टी) बरोबर आजवर अनेक नामवंत चेहरे जोडले गेले आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर, सायली संजीव, शिवानी बावकर, अभिनेता निखिल चव्हाण यांच्यासह दिग्दर्शक संजय जाधव ही प्लॅनेटशी जोडले गेले आहेत. तर महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधवही नुकताच ‘प्लॅनेट टॅलेंट’बरोबर जोडला गेला आहे. आता अभिनेत्री गायत्री दातार हे नावही ‘प्लॅनेट टॅलेंट’शी जोडलं जाऊन येत्या काळात दिमाखात झळकणार यात शंका नाही.
‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून ईशा अर्थातच अभिनेत्री गायत्री दातार घराघरात पोहचली. तिच्यातील सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर ‘युवा डान्सिंग क्विन’ या डान्स रिॲलिटी शोच्या माध्यमातून आपल्या अदाकारीने आणि नृत्यकौशल्यातून तिने प्रेक्षकांना भुरळ घातली. ‘निम्मा शिम्मा राक्षस’ या नाटकातही तिने उत्कृष्ठ कामगिरी बजावली. गायत्री सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून आपल्या विनोद बुद्धीने आणि कॉमेडीच अचूक टायमिंग साधत अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवते. अभिनय, कॉमेडी आणि नृत्य अशी बहुरंगी काम करणारी ही हरहुन्नरी अभिनेत्री आता बहुचर्चित ‘प्लॅनेट मराठी'च्या 'प्लॅनेट टॅलेंट'चा एक भाग बनली आहे.