मुंबई -अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी 'जवानी जानेमन' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नितीन कक्कर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, सैफच्याच होम प्रोडक्शनमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री तब्बूदेखील महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. तिने तिचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'जवानी जानेमन' चित्रपटात सैफसोबत झळकणार तब्बू, फर्स्ट लूक प्रदर्शित - social media
'जवानी जानेमन' या चित्रपटात सैफ हा ४० वर्षीय वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर, त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला ही झळकणार आहे. हा तिचा पदार्पणाचा चित्रपट आहे.
'जवानी जानेमन' या चित्रपटात सैफ हा ४० वर्षीय वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर, त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला ही झळकणार आहे. हा तिचा पदार्पणाचा चित्रपट आहे. ती सैफच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.
तब्बूदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तिने सोशल मीडियावर तिचा पहिला लूक शेअर केला आहे. सुरुवातीला तब्बूच्या जागी दीपिका पदुकोण आणि करिना कपूर खान यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, तब्बूच्या लूकनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.