महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'टी सिरीज' मध्ये कार्यरत कामगाराला कोरोनाची लागण, बीएमसीकडून कार्यालयाची इमारत सील

टी सिरीजच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाबाधा झाली आहे. इतरांचे नमुणे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्याने हे ऑफिस सील करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे.

T-Series office sealed
'टी सिरीज'चे ऑफिस बीएमसीने केले सील

By

Published : May 11, 2020, 1:41 PM IST

मुंबई - टी सिरीजध्ये काम करणारा व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याने बृहन्मुंबई म्युन्सिपल कार्पोरेशन ( बीएमसी ) ने टी-सिरीजची इमारत सील केली आहे.

टी सिरीजच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेला व्यक्ती अंधेरीच्या ऑफिसमध्येच रहात होता. त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याने या विषाणूचा प्रार्दुर्भाव वाढू नये, यासाठी ऑफिस सील करण्यात आले आहे.

यातील काही लोक परप्रांतीय असल्यामुळे ते परत जाऊ शकत नव्हते. त्यांच्यासाठी ऑफिसमध्ये राहण्याची सुविधा आहे. पण त्यातील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे.

ऑफिसमध्ये राहणाऱ्या दोन-तीन जणांचे रक्ताचे नमुणे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांचा रिपोर्ट अजून आलेला नाही. परंतु काळजी म्हणून बीएमसीने ऑफिस सील करण्याचा निर्णय घेतला आहे, असे टी-सिरीजच्या प्रवक्त्याने पुढे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details